पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी महिला डॉक्टरवर गुन्हा…

कणकवली येथील प्रकार; विरोधात बातमी दिल्याच्या रागातून घडलेला प्रकार…

कणकवली,ता.२४: येथील डिजीटल मिडीयाचे पत्रकार भगवान लोके यांना धमकी दिल्या प्रकरणी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ञ अर्पिता आचरेकर यांच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोके यांनी गरोदर मातांना प्रसूतीसाठी वणवण करावी लागते. या शिर्षकाखाली बातमी प्रसिध्द केली होती. याचा राग मनात ठेवून आचरेकर यांनी त्यांना फोन करुन शिवीगाळ व मारहाण करण्याची धमकी दिली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे, असा दावा करण्यात आला आहे.