त्यावेळी टर्मिनस प्रतिष्ठेचा मुद्दा करणारे दीपक केसरकर आता गप्प का..?

संदिप निंबाळकरांचा सवाल; राजकारण्यांनी फसवा-फसवीचा धंदा बंद करावा…

सावंतवाडी,ता.२६: शिवसेनेत असताना टर्मिनस प्रश्नावरून प्रतिष्ठेचा मुद्दा करणारे मंत्री दीपक केसरकर आता सत्तेत असताना गप्प का..? ते नेमकी आपली भूमिका का स्पष्ट करत नाही? टर्मिनस हा प्रश्न इतके दिवस का रेंगाळला आहे? असा सवाल एडवोकेट संदीप निंबाळकर यांनी आज येथे आयोजित बैठकीत केला.

दरम्यान महामार्ग आणि रेल्वे स्टेशन शहराच्या बाहेर गेले आहे. त्यामुळे त्याचा मोठा फटका शहराच्या विकासाला बसला आहे. राजघराण्यांची जागा असताना सुद्धा त्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटीचे हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर, पाच वर्षे चर्चे पलीकडे काहीच झाले नाही. त्यामुळे आता हा फसवा फसवीचा धंदा बंद करावा असा सल्ला त्यांनी दिला. टर्मिनस प्रश्नी आता गप्प बसण्याची गरज नाही. निवडणुकीच्या तोंडावर एखादी मागणी झाल्यास ती मान्य होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. टर्मिनसच्या प्रश्नावर भूमिका ठरविण्यासंदर्भात या ठिकाणी टर्मिनस प्रेमींची बैठक घेण्यात आली त्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी अभिमन्यू लोंढे, मिहिर मठकर, बबन साळगावकर, महेश परुळेकर, यासीन मुलाणी, सागर तळवडेकर, अर्चना घारे परब, सागर नाणोस्कर, रमेश बोंद्रे, गणेश बोर्डेकर, वासुदेव देऊलकर, रवींद्र ओगले, रफीक मेमन, साईनाथ शिरसाट, विनायक गावस, सुभाष शिरसाट, साहील नाईक, बाबल वाडकर, प्रथमेश पाडगावकर, सिद्धेश सावंत, भूषण बांदिवडेकर, विहंग गोटोस्कर, समीर वंजारी, तेजस पोयेकर, वैभव परब, एडवोकेट नकुल पार्सेकर, अमोल टेंबकर, हिदायतुल्ला खान, तबरेज बेग, चंद्रकांत बांदेकर, शेखर पाडगावकर, जगदीश मांजरेकर, पुंडलिक दळवी, एडवोकेट सायली दुभाषी, सत्यवान साटेलकर, एडवोकेट नंदन वेंगुर्लेकर, जी. ए. बुवा आदी उपस्थित होते.