मडूरा पतसंस्था चेअरमन पदी सुरेश परब बिनविरोध…

बांदा,ता.२५: मडूरा येथील मडूरा पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सुरेश बुधाजी परब यांची बिनविरोध निवड झाली. व्हाइस चेअरमन पदी भिकाजी धुरी यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या सभेत हे निवड प्रक्रिया संपन्न झाली.

यावेळी संचालक प्रकाश गावडे, ज्ञानेश परब, संजना परब उपस्थित होते. पतसंस्थेला आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सभेत चर्चा करण्यात आली. पतसंस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार चोख असून पतसंस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीने भविष्यात प्रयत्न करणार, असे नवनिर्वाचित चेअरमन सुरेश परब यांनी सांगितले. कर्मचारी सुनील माधव यांनी आभार मानले.