सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत सुद्धा राणे “फॅक्टर”, मनीष दळवी अध्यक्ष…

उपाध्यक्षपदी अतुल काळसेकरांना संधी; महाविकास आघाडीला पुन्हा एकदा “दणका”…

ओरोस ता.१३: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ अखेर आमदार नितेश राणे यांचे समर्थक असलेल्या मनीष दळवी यांच्या गळ्यात पडली आहे. तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांना संधी मिळाली आहे. विरोधकांकडून आयत्यावेळी अर्ज दाखल करण्यात आले, मात्र त्या ठीकाणी झालेल्या मतदान प्रक्रियेत अकरा विरुद्ध सात मतांनी या दोघांना विजय मिळाला आहे. त्यांच्या विजयानंतर त्या ठिकाणी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
यावेळी नारायण राणे तुम आगे बढो..!, हम तुम्हारे साथ है…!, अशा घोषणांनी जिल्हा बँकेचा परिसर दणाणून सोडला. दरम्यान पुन्हा एकदा जिल्हा बँक राणे यांच्या ताब्यात राहिल्यामुळे त्याचा फायदा आता आगामी काळात होणाऱ्या निवडणूकांत होणार आहे.