इन्सुली येथील रोहन रेडकर याच्या पोलीस कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

2

बोगस आयपीएस अधिकारी प्रकरण

वेंगुर्ले, ता. २७ : आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केलेल्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील रोहन शिवाजी रेडकर याच्या पोलीस कोठडीत ३ जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
रोहन याने मालवण येथील लवु साबाजी येरागी यांच्याकडून टुरिझम बोटीचे टेंडर मिळवून देण्यासाठी ५०,००० घेवून फसवणुक केली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी २६ जून रोजी सांयकाळी रोहन याला नवाबाग येथून ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयाने १ जुलै पर्यंत पोलिस कोठडी दिली होती. ही मुदत आज संपताच त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता अधिक तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीत ३ जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
आर्थिक फसवणूक करणाऱ्या रोहन याच्या विरोधात भादवी कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल आहे. पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी तपास सुरू असताना रोहन याने गोव्यातही असे प्रकार केल्याचे पुढे आले आहे. त्याच्याकडील अन्य माहिती तसेच सोबत अजून कोण आहे का हे तपासण्याचे काम सुरू आहे.

1

4