इन्सुलीतील त्या युवकाने मळगावातील व्यक्तीला 70 लाखाला लुटले

615
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कारनामे उघड : पेट्रोल पंप मंजूर करून देण्यासाठी घेतले पैसे

वेंगुर्ले, ता. ०१ : पेट्रोल पंप मंजूर करून देतो असे सांगून इन्सुली येथील रोहन रेडकर या युवकाने मळगावातील एका मुंबईस्थित व्यक्तीला तब्बल 70 लाखाला फसविल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी मुंबई येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून मालवण येथील लवू येरागी याची फसवणूक केल्याप्रकरणी रेडकर याला आज येथील न्यायालयात हजर केले असता त्याला 3 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आयपीएस अधिकारी असल्याचे सांगून इन्सुली येथे रोहन रेडकर याने अनेकांना गंडा घातला आहे. त्याचे कारनामे आता उघड होत आहेत. मळगाव येथील मुंबईस्थित एका व्यक्तीला त्याने पेट्रोल पंप मंजूर करून देतो असे सांगून तब्बल 70 लाखाला लुटले. त्यासाठी इन्सुली येथील हायवेलगतची जागा दाखविली. आपण वरिष्ठ स्तरावरून सर्व परवानग्या घेवून देतो असे त्याने सांगितले. त्यामुळे त्या संबंधित व्यक्तीने आपल्या नावावर असलेली रोख रक्कम, दागिने आणि जमिन विकून त्याला 70 लाख रुपये दिले. हा प्रकार उघड होण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने त्याच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली. परंतू रेडकर याने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या प्रकरणी फसवणुक झाल्याची तक्रार संबंधित व्यक्ती मुंबई येथे करणार असल्याचे समजते.

\