कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडेंनी घेतली बबन साळगावकरांंची भेट

623
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वॉटर स्पोर्ट क्लबची पाहणी : स्वच्छता अभियान बक्षिसावरून चर्चा

सावंतवाडी, ता.०१: येथील नगराध्यक्ष बबन साळगावकर हे आता विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आज चक्क महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे यांनी त्यांची आज सावंतवाडी पालिकेत येऊन भेट घेतली.
यावेळी सावंतवाडीसह वेंगुर्ले व कणकवली या नगरपालिकांना स्वच्छता अभियानांतर्गत मिळालेली बक्षिसाची रक्कम मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक अबीद नाईक उपस्थित होते. दरम्यान त्या सर्वांनी मोती तलावात सुरू असलेल्या वॉटर स्पोर्ट क्लबची पाहणी केली व हा उपक्रम स्त्युत्य असल्याचे सांगितले. यावेळी नगरसेवक अनारोजीन लोबो, भारती मोरे आदी उपस्थित होत्या.

\