Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याशिर्डीत प्रसादामध्ये गुंगीचे औषध टाकून साईभक्तांना लुटणाऱ्या महिलेला पकडले

शिर्डीत प्रसादामध्ये गुंगीचे औषध टाकून साईभक्तांना लुटणाऱ्या महिलेला पकडले

 

शिर्डी, ता.०१ : शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात संस्थानच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रसादात गुंगीचे औषध टाकून साई भक्तांना लुटणाऱ्या एका महिलेला साई संस्थानच्या सुरक्षारक्षकांनी आज पकडले. या घटनेने शिर्डी परिसरात खळबळ उडाली असून या महिलेला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

19 जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिर्डीतील बिरोबा कॉलनी येथील वयोवृद्ध महिला छबुबाई गरड या नेहमीप्रमाणे दररोज साईबाबांची दुपारची मध्यान्ह आरती करुन आरतीचा प्रसाद घेण्यासाठी गुरुस्थान मंदिरा जवळ गेल्या होत्या. यावेळी तिथून एक महिलेने जवळ येऊन त्यांना प्रसाद दिला.

छबुबाई यांनी प्रसाद खाल्यांनतर थोड्याच वेळात गुंगी येऊन पडल्या. त्यांनी थोड्या वेळाने उठून पाहिलं असता त्यांच्या गळ्यातील दागिणे गायब झाले होते. आपल्या गळ्यातील तीन ग्रॅम सोन्याची पोत आणि काही पैसे घेऊन एक महिला गेली असल्याची माहिती छबुबाई यांनी संस्थानच्या सुरक्षारक्षकांना दिली होती.

या माहितीच्या आधारे संस्थानच्या सुरक्षारक्षकांनी 19 जून रोजीचे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यावेळी एक महिला या वयोवृद्ध आजीच्या गळ्यातील पोत काढून घेऊन जात असल्याचा प्रकार समोर आला. यानंतर संस्थानच्या सुरक्षारक्षकांनी या महिलेचा तपास सुरु केला.

अखेर आज ही महिला पुन्हा साई मंदिर परिसरात दिसून आली. या महिलेला पकडून सुरक्षा कार्यालयात चौकशीसाठी आणले. ही महिला झारखंड येथील असून तिचे नाव पिंकी असल्याचे सांगितले आहे. साई मंदिरात या वयोवृद्ध महिलेला साई प्रसादात गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करत त्यांच्याकडील पैसे तसेच सोने काढून घेतले असल्याची कबुली पिंकीने दिली आहे. साई संस्थानने शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments