दोडामार्ग: गावच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र मेहनत घेऊन विविध अभियाने, उपक्रम व योजना प्रभावीपणे राबवित हेवाळे गावाचे नावलौकिक करण्यासाठी सिंहाचा वाटा उचल्याबद्दल व अन्य ग्रामपंचायत समोर एक सकरात्मक आदर्श निर्माण केल्याबद्दल तालुका स्मार्ट ग्रामपंचायत हेवाळे गावचे सरपंच संदीप देसाई यांचा दोडामार्ग तालुका पंचायत समितीच्यावतीने सलग तिसऱ्या वर्षी विशेष गौरव करण्यात आला. पंचायत समिती सभापती सौ. संजना कोरगावकर यांच्या हस्ते कृषीदिनी आयोजित कार्यक्रमात हा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर उपसभापती उपसभापती बाळा नाईक, जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर, सौ. संपदा देसाई, प. स. सदस्य धनश्री गवस, गणपत नाईक, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी बेहरे, कृषी अधिकारी कुलकर्णी, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, माजी सभापती महादेव बोर्डेकर, सामाजिक वनीकरण वनपाल अस्मिता बोधे, पशुसंवर्धन अधिकारी दाभाडे, कृषी अधिकारी निलेश जाधव, कुंब्रल सरपंच प्रवीण परब, उपसरपंच धारगळकर आदी उपस्थित होते. यावेळी पंचायतराज व ग्रामपंचायत अंतर्गत विविध अभियान व उपक्रम स्पर्धा, पुरस्कार पटकविणारे ग्रामपंचायत सरपंच यांचा सन्मान संपन्न झाला. तसेच चंदेरी कार्डचे मान्यवरांचे वाटप झाले. आयनोडे हेवाळे गावचे सरपंच संदीप देसाई यांनी संत गाडगेबाबा अभियानात सलग तीन वर्षे दोडामार्ग तालुक्यात प्रथम क्रमांक पटकविताना चालुवर्षी संत गाडगेबाबा अभियानात जिल्ह्यात प्रथम, तर संत तुकाराम वनग्राम योजनेत जिल्हयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शिवाय सलग गेल्या पांच वर्षात हेवाळे गावात सार्वजनिक पाणी पुरवठा करणारे सर्व पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवत ते कोठेही सदोष आढळून न आल्याने सलग पाच वर्षे ग्रीन कार्ड नंतर यावर्षी पालकमंत्री दीपक केसरकर व जि. प. अध्यक्षा सौ. संजना सावंत यांच्या स्वाक्षरीचे चंदेरी कार्ड वितरित करण्यात आले.
हेवाळे सरपंच संदीप देसाई यांचा दोडामार्ग पंचायत समितीच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी गौरव
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES