चिकन मटण विक्रेत्यांकडून होणारी फसवणूक रोखा

506
2
Google search engine
Google search engine

शिवसेनेची मागणी:सावंतवाडी पालिकेच्या मुख्याधिका-यांना निवेदन

 

सावंतवाडी, ता.०२: चिकन, मटण विक्रेत्यांकडुन शहरातील नागरिकांची होणारी फसवणूक रोखा,स्वच्छतेकडे लक्ष दया अशी मागणी सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने आज पालिकेकडे करण्यात आले.याबाबत आज मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान याबाबत आपण दखल घेवू मात्र दरावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही परंतू स्वच्छतेबाबत योग्य ती कारवाई करू असे आश्वासन श्री जावडेकर यांनी दिले.
यावेळी शब्बीर मणीयार,सुरेद्र बांदेकर,विशाल सावंत,सतिश नाईक,संजय पेडणेकर,विश्वास घाग, सदा राणे आदी उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले आहे की, शहरातील पालिका क्षेत्रात केली जाणारी बकरा मटण विक्री आणि चिकन सेंटरमधील विक्री ही आरोग्याला अपायकारक तसेच कोणतीही तपासणी न करता केली जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोकाला निर्माण झाला आहे. याला पालिका प्रशासनाला जबाबदार धरले जाणार आहे. चिकन सेंटरमधील कोंबड्या आरोग्यास अपायकारक नाहीत याची तपासणी केली जात नाही. आरोग्य विभागाकडून याबाबतची तपासणी होत नाही. येत्या चार दिवसात ही तपासणी सुरू केली जावी अशीही मागणी निवेदनात केली आहे. मार्केट दरानुसार चिकनची विक्री केली जात नाही. चुकीच्या पद्धतीने चिकनची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. बकरा मटणचे दर बाजारभावाप्रमाणे निश्चित करावे. शिवसेना या व्यावसायिकांच्या विरोधात नसून नागरिकांची फसवणूक होऊ नये तसेच आरोग्याच्या प्रश्न उपस्थित होऊ नये असाच हेतू आमचा आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात पालिका प्रशासनाने यात लक्ष घालून कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असे इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.