शहरात अभियान राबविणार : मागच्यावेळी यश न मिळाल्याची नगराध्यक्षांची खंत
सावंतवाडी, ता.०२: येथील पालिकेच्यावतीने स्वच्छता अभियानात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात आले. मात्र दुर्दैवाने आम्ही नंबर मिळविण्यात कमी पडलो अशी खंत व्यक्त करत यापुढे पुन्हा एकदा जोमाने उभे राहू असे आवाहन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केले.
सावंतवाडी शहरात पुन्हा एकदा स्वच्छता सर्व्हेक्षण 2020 सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर उपनगराध्यक्षा अन्नपूर्ण कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, सुरेंद्र बांदेकर, आनंद नेवगी, माधुरी वाडकर, दिपाली भालेकर, भारती मोरे, समृद्धी विरनोडकर, शुभांगी सुकी, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, देवा टेमकर, अण्णा देसाई, संजय पेडणेकर, डॉ. राजेश नवांगुळ, आबा कशाळीकर, मृणालिनी कशाळीकर आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. साळगावकर म्हणाले, पुन्हा एकदा जोमाने सावंतवाडी शहर स्वच्छता अभियानात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करू. त्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यासाठी ओला व सुक्या कचर्याचे विलीनीकरण करण्याबरोबरच रस्ते, घराच्या बाजूचे आवार, शासकीय कार्यालये स्वच्छ राहण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सौ. कोरगावकर म्हणाल्या, या ठिकाणी कामगार कचर्यात काम करत असताना त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे त्यांना त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी कचरा कसा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी येथील नागरिकांनी पुढाकार दर्शवावा. यावेळी श्री. नवांगुळ, श्री. देसाई व मुख्याधिकारी जावडेकर यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सावंतवाडी शहरात कचरा उचलणार्या कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. यात शिवराम जाधव, भागू पाटील, धोंडू बरागडे, चंद्रकांत कदम, दया जाधव, रविंद्र कोनाळकर, नागेश कोचरेकर, सदानंद कदम, विनोद काष्टे, वासू कदम यांचा समावेश आहे.
यावेळी स्वच्छता अभियानात यशस्वी होणार्या हॉटेल के. पी. किचन, स्वच्छ हॉस्पीटल म्हणून यशराज हॉस्पीटल, स्वच्छ बाजारपेठ म्हणून फिश मार्केट, स्वच्छ शासकीय कार्यालय म्हणून तहसिलदार कार्यालय, स्वच्छ गृहनिर्माण संस्था म्हणून दत्त अनघा पार्क आणि स्वच्छ शाळा म्हणून मिलाग्रीस हायस्कुल आदींना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शैलेश नाईक यांनी केले.