सावंतवाडी,ता.०२: पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज स्मृतिदिनानिमित्त दिनांक चार जुलै रोजी आयोजित नगराध्यक्ष त्याच्या स्पर्धेत निमित्त देण्यात येणाऱ्या चषकाचे अनावर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर नगरसेवक बाबू कुडतरकर सुरेंद्र बांदेकर आनंद नेवगी शुभांगी सुकी दिपाली भालेकर समृद्धी विर्नोडकर आदी उपस्थित होते. नगरपरिषदेने पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज स्मृती आठवी जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक 2019 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धीबळ व कॅरम अशा इनडोअर स्पर्धा 4 ते 6 जुलै या कालावधीत येथील नगरपरिषदेच्या जिमखाना मैदानाकडील स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.
स्पर्धेसाठी शाळेतील मुलांची यादी किंवा वैयक्तिक नावे 2 जुुलैपर्यंत नगरपरिषद कार्यालय लिपीक नागेश बिद्रे, निलेश तळवडेकर, नगरपरिषद कार्यालय यांच्याकडे कार्यालयीन वेळेत नोंदवावीत.