Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोंकण पर्यटनआंबोलीत मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लबच्यावतीने स्वच्छता मोहिम

आंबोलीत मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लबच्यावतीने स्वच्छता मोहिम

आंबोली, ता. ०२ : जैवविविधतेच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल समजल्या जाणार्‍या आंबोलीत उभयचर व सरपटणार्‍या प्राण्यांच्या अधिवासात पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे काम करणार्‍या मलबार नेचर कॉन्झर्वेशन क्लब या निसर्गप्रेमी संस्थेच्यावतीने आज स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. एन्व्हायरमेंट एज्युकेशन सेंटर गोवा आणि ग्रीन फाऊंडेशन पुणे माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोहिमेमध्ये पहिल्या टप्प्यात चौकुळ रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या बेडूक व सरपटणाऱ्या या प्राण्यांच्या अधिवासात टाकण्यात आलेले प्लास्टिक व कचरा स्वच्छ करण्यात आला.

यात प्लास्टिक बॉटल वेगळे करण्यात आले. बिस्किट वेफर्सची प्लास्टिकची पाकिटे वेगळी करण्यात आली तर काच बॉटलही वेगळे करण्यात आले. या तीनही गोष्टी वेगळ्या करून त्या पुनर्प्रक्रिया करण्यासाठी पाठविण्याचा संस्थेच्या सदस्यांचा माणस आहे. आंबोलीमध्ये वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा फेकण्यात येतो. हा कचरा वाऱ्याने जंगलामध्ये उडून जातो व विविध पाण्याच्या स्त्रोतांमध्ये अडकून बसतो किंवा ओढ्यामध्ये साचून राहतो. ज्यामुळे पुढे पुढे वाहत नाहीत व ओढ यांमधील जैवविविधतेला याचा फटका बसतो. या सगळ्याचा अभ्यास करून पुणे येथील निसर्ग अभ्यासक व संस्थेचे सदस्य मनीष परदेशी तसेच कोल्हापूर येथील मानद वन्यजीव संरक्षक रमण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. यावेळी जंगलांमध्ये साठलेला कचरा सदस्यांनी साफ केला. संपूर्ण जगामध्ये केवळ आंबोली व चौकुळ या भागांमध्ये सापडणारा बेडूक ज्याला अंबोली तोड असे म्हटले जाते. त्या बेडकाचा अधिवासही स्वच्छ करण्यात आला. भारतामध्ये पश्चिम घाटातील महाराष्ट्रामध्ये दिसणारा मलाबार ग्लायडिंग फ्रॉग या बेडकाचा ही अधिवास यावेळी स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेमध्ये संस्थेचे सदस्य शुभम साळवे, केदार जाधव, पार्थ भिसे, सालवीन गोन्साल्विस, अनिश परदेसी, रमण कुलकर्णी, राजेश देऊलकर, काका भिसे आदी सहभाग घेतला होता. येत्या काळात संपूर्ण आंबोलीतील अशा विविध संवेदनशील आदिवासाची स्वच्छता करण्याचा मानस संस्थेच्या सदस्यांनी बोलून दाखविला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments