मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा; ‘हाय अलर्ट’ जारी
मुंबई/अजित जाधव, ता. ०२ : सलग तीन कोसळणा-या पावसाने राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मुंबईत आज दिवसभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सलग तीन दिवस मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी शाळांना सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. राज्यात उशिरा दाखल झालेल्या पावसाने मुंबई शहरसह उपनगरात जोरदार बॕटींग केली आहे. आज मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई करांनो आवश्यक असल्यास बाहेर पडा. असे आवाहनही करण्यात आले आहे. मुंबई सह कोकणात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.