मनसेच्या दणक्यानंतर सावंतवाडी-आंबोली रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरवात…

233
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.०२; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्या नंतर येथील जिमखाना मैदान परिसरातील सावंतवाडी-आंबोली रस्त्यावर पडलेले भलेमोठे खड्डे बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरवात करण्यात आली आहे.दोन दिवसापूर्वी मनसे कडून या खड्ड्यात भर पावसात वृक्षारोपण करून संबंधित प्रशासनाचा निषेध करण्यात आला होता.तर तात्काळ खड्डे न बुजविल्यास रास्ता रोको करू असा इशारा यावेळी देण्यात आला होता.याची दखल घेऊन बांधकाम विभागाचे सी.एल.ठाकूर व श्री.निकम यांच्या उपस्थितीत हे खड्डे बुजविण्यात आले.
येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले होते.तर भर पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून हे खड्डे अपघाताला आमंत्रण ठरणार होते.यासंदर्भात संबंधित प्रशासनाला मनसे कडून खड्डे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.याची दखल घेऊन ही कार्यवाही करण्यात आली.
यावेळी मनसेचे अँड.राजू कासकर,शहराध्यक्ष आशिष सुभेदार,जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भैरवकर,परिवहन तालुकाध्यक्ष अतुल केसरकर,बाबू केसरकर,गौरेश वाडकर,बाबू सावंत,किरण भिसे आदी उपस्थित होते.

\