विद्यार्थ्यांनी थोर पुरूषांची चरित्रे वाचली पाहिजे

116
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शैलेंद्र रावराणे; आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात महाराणा प्रतापसिंह व राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात

वैभववाडी/प्रतिनिधी :थोर पुरूषांच्या जयंतीतून नवीन पिढीला प्रेरणा व दिशा मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थोर पुरूषांची चरित्रे वाचली पाहिजे. या चरित्रातून आदर्श, जीवन मुल्ये, राष्ट्राभिमान, सामाजिक दायित्व आत्मसात करून आचरणात आणल्यास सशक्त समाज व राष्ट्राची निर्मिती होईल. असे प्रतिपादन शैलेंद्र रावराणे यांनी व्यक्त केले.
आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडी येथे महाराणा प्रतापसिंह व राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सी. एस. काकडे, प्रा. एस. एन. पाटील, शरदचंद्र रावराणे, प्रमोद रावराणे, प्रा. डॉ. व्ही. ए. पैठणे, प्रा. एम. आय. कुंभार, प्रा. आर. ए. भोसले, प्रा. डॉ. श्रीमती डी. एस. कोरगावकर आदी उपस्थित होते.
महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्य गाथामधून विद्यार्थ्यांनी संघर्ष आणि देशाभिमान घ्यावा. व छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक क्रांतीमुळे शिक्षणाची गंगा बहुजनापर्यंत पोहचली आहे. याचा विद्यार्थ्यांनी आपल्या जीवन उध्दारासाठी उपयोग करावा. असे प्रा. डॉ. सी. एस. काकडे यांनी सांगितले.
यावेळी प्रा. एस. एन. पाटील, यांनी छत्रपती शाहू महाराजांनी स्त्री विषयक केलेल्या कायद्यांचा व कार्याचा आढावा घेतला. कु. प्रियांका वाडेकर, नेहा धुरी व राजश्री बेळेकर या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. श्रीमती डी. एस. कोरगांवकर यांनी केले तर आभार प्रा. आर. ए. भोसले यांनी व्यक्त केले.

\