सिंधुदुर्गनगरी /प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला असून शासकीय तंत्रनिकेतन मालवण मधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. तसेच बऱ्याच विद्यार्थ्यांना विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.
या परीक्षांमध्ये तृतीय वर्षाच्या विविध विभागात प्रथम आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत. सिवील शाखेतून शुभम संतोष परब प्रथम आला आह. तर स्वप्नाली सीताराम होरेकर द्वितीय, अक्षयकुमार भास्कर पालेकर तृतीय, कॉम्प्यूटरमधून सुगम अशोक तावडे, प्रथम, सोनाली राजेश पवार द्वितीय, रतन रामकृष्ण राऊळ तृतीय, इलेक्ट्रिकलमधून अमृता विष्णू गावडे प्रथम, समरीन हसन शेख द्वितीय, समीक्षा तुकाराम धुरी तृतीय, इलेक्ट्रॉनिक्समधून क्रांती गोपाळ तेंडोलेकर प्रथम, अनिकेत धनाजी पाटील द्वितीय, जितेंद्र महादेव परब तृतीय, फूड टेक्नॉलॉजीमधून मधुरा जयकुमार म्हेत्रे प्रथम आली आहे. तर ओमकार दिनेश भोसले व मनीषा उमेश गवस यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. मेकॅनिकल शाखेतून रुपाली पेडणेकर प्रथम, रुतम राजन भगत द्वितीय व प्रतिभा बापू कलिंगण तृतीय क्रमांक पटकावला असल्याचे शासकीय तंत्रनिकेतन मालवणचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी कळविले आहे.