सिंधुदुर्गात १३ जुलैला लोकअदालतीचे आयोजन

2

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालु वर्षातील दुसर्‍या लोकअदालतीचे आयोजन 13 जुलै रोजी सर्व तालुका न्यायालयांमध्ये व जिल्हा न्यायालयात करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव अतुल उबाळे यांनी दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा मुंबई यांच्या सुचनेनुसार २०१९ सालचे दुसर्‍या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, बॅकेची कर्ज वसुली प्रकरण, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद प्रकरण, कामगारांचे वाद प्रकरण, भुसंपादन प्रकरण, विद्युत व पाणीदेयक बद्दलचे प्रकरण, दिवाणी प्रकरणे( भाडे, वहिवाटीचे हक्क,मनाई हुकूमाचे दावे) ठेवण्यात येणार आहेत. ज्या पक्षकारांची वरिल संवर्गातील प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत अशांनी आपली प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालती मध्ये सुनावनी करीता ठेवण्यासाठी संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती किंवा सिंधुदुर्ग जिल्हा सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधून आपले वाद सामोपचाराने व कायमस्वरूपी मिटवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

9

4