जनशताब्दी, दादर-रत्नागिरी, तेजस, मत्स्यंगधा एक्स्प्रेस रद्द
कणकवली, ता.02 ः मुंबई शहर आणि उपनगरात झालेल्या अतिवृष्टीचा फटका कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या अनेक गाड्यांना बसला आहे. यात काल मुंबईला निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेल स्थानकातच थांबविण्यात आली. तीच गाडी आज मांडवी एक्स्प्रेस म्हणून मार्गस्थ करण्यात आली. याखेरीज आज मुंबईहून सुटणारी जनशताब्दी, दादर-रत्नागिरी, तेजस आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या दोन ते पाच तास विलंबाने धावत आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची स्थिती पुढीलप्रमाणे ः
*मुंबईहून सुटणार्या रद्द झालेल्या गाड्या*
12051 जनशताब्दी एक्स्प्रेस
50103 दादर-रत्नागिरी पॅसेंजर
22119 सीएसटीम-करमळी तेजस एक्स्प्रेस
12620 मत्स्यगंधा एक्स्प्रेस
*टर्मिनेट केलेल्या गाड्या*
1 जुलै रोजीची मुंबईला निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेल स्थानकापर्यंत नेण्यात आली. हीच गाडी आज पनवेल स्थानकातून मांडवी एक्स्प्रेस म्हणून मडगावकडे सोडण्यात आली.
12619 आणि 12620 एलटीटी ते मंगलुरू आणि मंगलुरू ते एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाडया पनवेल स्थानकापर्यंत आणून तेथूनच सोडण्यात आल्या.
*उशिरा धावणार्या गाड्या*
डाऊन कोकणकन्या 4.30 तास
गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस 4 तास
हमसफर एक्स्प्रेस 5.30 तास
निजामुद्दीन-त्रिवेंद्रम 5.30 तास
दादर-कोचिवली 2.12 तास
दिवा-सावंतवाडी 1.30 तास