उपजिल्हाधिका-यांच्या बोलावण्याकडे प्राचार्य हणमंत पाटलांची “पाठ”

2

युवा सेना आक्रमक:पुन्हा बैठक लावून तोडगा काढू,जोशीचे आश्वासन

 

सिंधुदुर्गनगरी, ता. ०२ : आयटीआयच्या रिक्त जागेसंदर्भात खुद्द उपजिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीकडे आयटीआयचे प्राचार्य हणमंत पाटील यांनी आज पाठ फिरवली. यावेळी आपल्याकडे गाडी नाही, आपण सावंतवाडीत आहोत असे सांगून त्यांनी ओरोस येथे येणे टाळले. त्यामुळे या प्रकाराबाबत युवा सेनेच्या पदाधिकारी नाराजी व्यक्त केली आहे तर संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका पाहून पुन्हा बैठक आयोजित करून योग्य तो तोडगा काढला जाईल असे आश्वासन उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले.
जिल्ह्यातील आठ आयटीआयची प्राचार्यांची पदे रिक्त आहेत. त्या ठिकाणी पाटील यांना अतिरिक्त चार्ज देण्यात आलेला आहे; मात्र ते काम करत नाही असा आरोप युवा सेनेचा आहे. याबाबत पुढील भूमिका घेण्यात यावी ही मागणी युवा सेनेकडून करण्यात आल्यानंतर आज याबाबत बैठक श्री. जोशी यांच्या दालनात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु बोलावून सुध्दा त्या बैठकीकडे श्री. पाटील यांनी पाठ फिरवली. आपल्याकडे गाडी नाही. त्यामुळे आपण कसे येणार असा उलट प्रश्न जोशी यांना केला. त्यांच्या भूमिकेबाबत उपजिल्हाधिका-यांसह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा व्यक्तीला जिल्ह्यातून बदलण्यात यावे अशी मागणी आपण आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे करणार असल्याचे यावेळी युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नानोस्कर यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा प्रमुख, विक्रांत सावंत, जिल्हाधिकारी मंदार शिरसाट युवासेना, तालुकाप्रमुख सावंतवाडी योगेश नाईक, पंकज शिरसाट, भिवा गवस, सोनू गवस, उपतालुका प्रमुख गुणाजी गावडे, संदीप महाडेश्वर, आदित्य आरेकर, गौरव जाधव आदी उपस्थित होते

4