सावंतवाडी श्री पंचम खेमराज बी. कॉम. शाखेचा निकाल ९६ टक्के…

272
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता.०२ : येथील श्री.पंचम खेमराज महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष बी. कॉम. (बँकिंग अँण्ड इन्शूरन्स) या विभागाचा निकाल 96ः42 टक्के लागला आहे. यात यशश्री मेघःश्याम मांजरेकर हिने 87 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
सच्चिता चंद्रकांत दळवी 81.67 टक्के गुणसह व्दितीय तर राहूल तातो चिपकर आणि हर्षाली सुदाम राऊळ 80 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. 56 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष खेमसावंत-भोसले, चेअरमन शुभदादेवी भोसले, विश्वस्त लखमराजे भोसले, प्राचार्य डॉ. डि. एल. भारमल यांनी अभिनंदन केले.

\