काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊनच काम करणार : एम.के. गावडे

2

वेंगुर्ले, ता.०२ : आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊनच काम करणार आहोत. नुकत्याच झालेल्या निवडणुकांत आम्ही ते प्रकर्षाने पाळले येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही सोबतच राहणार आहोत अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी एम.के. गावडे यांनी मांडली
नुकत्याच सावंतवाडी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीत गरमागरम चर्चा झाली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसला सहकार्य करणार नाही अशी भूमिका घेतली होती. या भूमिकेला श्री. गावडे यांनी समर्थन दिले होते. यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र आपले बोलणे हे पक्षाच्या विरोधात नव्हते त्या ठीकाणी मांडलेली भूमिका ही त्या ठिकाणी असलेल्या अन्य राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली होती असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, राष्ट्रवादी व काँग्रेस हे दोघेही पारंपरिक मित्र पक्ष आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत. पक्षाने सूचना केल्यानंतर आम्ही निश्चितच काँग्रेसला मदत करू. त्यामुळे आपल्या विधानाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये. त्या ठिकाणी गुप्त बैठक होती त्यावेळी अन्य काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या परंतु आम्ही यापुढे मित्र धर्म पाळणार आहोत असे गावडे म्हणाले.

15

4