अर्चना फाउंडेशनच्यावतीने भालावलमध्ये चष्मे वाटप कार्यक्रम

208
2

सावंतवाडी, ता.०२ : तालुक्यातील भालावल गावात गरजूंना संसदरत्न खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्चना फाउंडेशनच्या सौजन्याने मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

ज्यांच्या प्रेरणेतुन आणी सहकार्यातून आपण समाजकारणात, राजकारणात सक्रिय झालो त्या खा. सुप्रीया सुळे यांचा वाढदिवस आपल्या माहेरच्या गावी साजरा करताना आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त करत अर्चना घारे – परब यानी खा. सुप्रीया सुळे यांना वाढदिवसाच्या निमीत्ताने शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी राष्टवादीचे पदाधिकारी सुरेश गवस, येम् डी सावंत, भाई भाईप, सत्यजित धारणकर, रमेश परब, उदय परब आदी मान्यवर तसेच भालवल, विलवडे, असनिये, ओटावने, तांबोळी, कोणाशी, सरमाळे इत्यादी गावतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

4