वेंगुर्लेतील विजेच्या प्रश्नांवरून महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आक्रमक | वीज कार्यालयात धडक : अधिकारी धारेवर

2

वेंगुर्ले, ता.२ :वेंगुर्ले शहरासह तालुक्यातील नागरिक विजेच्या खेळखंडोबा प्रकारामुळे हैराण झाले आहेत. आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या वेंगुर्ले येथील कार्यालयात धडक देत अधिकारी नागेश बसरगट्टी यांना जाब विचारला. तसेच सेवेतील गैरसोयी दुर करणे, तालुकावासियांना विजेची चांगली सेवा द्यावी अशी मागणी केली. यावेळी श्री बसरगट्टी यांनीही आम्ही जास्तीत जास्त चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.
वेंगुर्ले तालुका स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष दादा कुबल, माजी तालुकाध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष बाबली वायंगणकर, महिला तालुकाध्यक्षा सौ.सारीका काळसेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज अचानक अधिकारी श्री बसरगट्टी यांची भेट घेवून तालुक्यातील विजवितरण बाबतच्या विविध समस्या मांडल्या. यावेळी वसंत तांडेल, जयंत मोंडकर, नगरसेविका शितल आंगचेकर, कृपा मोंडकर, प्रार्थना हळदणकर, पप्पु परब, सायमन आल्मेडा तसेच भूषण सारंग, मनवेल फर्नांडीस, नितीन चव्हाण, मारुती दौडशानहट्टी, सुजाता देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वेंगुर्ले तालुक्यात विज समस्येबाबत आपल्या कार्यालयाकडून रितसर सर्व्हे झाला नसल्यामुळेच गाव पातळीवरुन विजेच्या काय समस्या आहेत ते समोर येत नाही. अनेक भागात ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे कमी दाबाचा विज पुरवठा होत असून त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. सध्या दोनदोन मिनटांनी लाईट जाण्या-येण्याचे प्रकार वाढले आहेत. याला पावसाळ्यापूर्वी सुरक्षितेच्या दृष्टीने करावयाची कामे न केल्यामुळे त्याचा परिणाम होत आहे. ज्यावेळी मार्च-एप्रिल मध्ये रस्त्याची बाजूची झाडी तोडणे, विज वाहक तारांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या कापणे, जुन्या तारा बदलणे, ट्रान्सफार्मची दुरुस्ती आदि विविध कामे करणे गरजेची होती. पण हि कामे झाली नाहीत त्याचा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. सध्या ज्यांचीज्यांची नवीन विज जोडणीची मागणी असेल त्यांना विज पुरवठा मिटर देवून सुरु करावा त्याचप्रमाणे दरम्यान यावेळी बोलताना श्री बसरगट्टी म्हणाले की, आम्ही जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करु. शहरातील अंडरग्राऊंड लाईनसाठी सर्व्हे झाला असून त्यांचेही काम युद्धपातळीवर सुरु आहे. पुढील मे महिन्यात हे काम पुर्ण होवून वेंगुर्लेला चांगली विज सेवा मिळणार आहे. परबवाडा येथील पाच विज पोल मंजूर असून त्यातील केवळ दोनच पोल बसविण्यात आले आहेत. उर्वरीत तीन पोल तात्काळ बसवावेत. अणसुर रवळनाथ मंदिर येथील फ्युज वारंवार जात असल्याने त्याचा नाहक त्रास तेथील ग्रामस्थांना बसतो तरी त्याबाबत योग्यती कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान वारंवार जाणाऱ्या विजेच्या लंपडावा मुळे लोकांचा इलेक्ट्रॉनीक वस्तुचे नुकसान होत आहे. त्यामुळे या मुख्य समस्येकडे लक्ष्य द्यावे अशी मागणी सर्व पदाधिकाऱ्यांनी केली.

4