वेंगुर्ले, ता. २ : तालुक्यातील शाळा उभादांडा नवाबाग मध्ये आज प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. एकनाथ आंबोकर यांच्या हस्ते ‘इ स्कुल व एमएससीआयटी’ उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री. आंगणे सर, जि.प.सदस्य श्री. विष्णुदास कुबल, वेंगुर्ला तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. संतोष गोसावी, वि.अ.मा.शेर्लेकर सर, वेंगुर्ले तालुका माजी गटविकास अधिकारी बाबली वायंगणकर, वेंगुर्ले हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. काळे सर, निकाँम इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. प्रशांत निकम, उभादांडा गावचे उपसरपंच श्री. गणपत केळुसकर, शा.व्य.समिती अध्यक्ष श्री. अनंत केळुसकर, वसंत तांडेल तसेच मोठ्या प्रमाणावर पालक-ग्रामस्थ उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापका श्रीम.रेडकर मँडम यांनी केले. यावेळी श्री. आंबोकर यांनी ‘इ स्कुल व एमएससीआयटी’ उपक्रम सुरू करणारी उभादांडा-नवाबाग हि जिल्ह्यातील पहिली शाळा असल्याबाबत गौरवोद्गार काढले. तसेच शाळेच्या इतर उपक्रमांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पोळजी सर व श्रीम.आपटे मँडम यांनी केले. श्री. पावले सरांचेही कार्यक्रमास सहकार्य लाभले. जि.प.सदस्य श्री. विष्णुदास(दादा) कुबल यांनी सदर कार्यक्रमास पुढाकार घेतला. शेवटी श्री. केळुसकर यांनी आभार मानले.
उभादांडा-नवाबाग शाळेत ‘इ स्कुल व एमएससीआयटी’ उपक्रमास प्रारंभ | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली शाळा
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES