साळीस्ते-कांजिरवाडी येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू…

2

कणकवली पोलिसात नोंद; लाईट पेटवत असताना घडली दुर्घटना…

कणकवली ता.२०: विजेच्या धक्क्याने साळीस्ते-कांजिरवाडी येथील २४ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल रात्री उशीरा घडली. शैलेश लक्ष्मण कांजिर, असे मृताचे नाव आहे. दरम्यान त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवक लाईट पेटवण्यासाठी बोर्ड मध्ये पिन लावत होता. यावेळी त्याला विजेचा जबरदस्त धक्का बसला. यात त्याला गंभीर दुखापत होऊन काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघातानंतर त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

347

4