चक्कर येऊन कोसळल्याने कुडाळ येथील युवकाचे निधन..

2

ओरोस ता. २०:* मराठी पत्रकार संघाचे सदस्य तथा जेष्ठ पत्रकार राजन चव्हाण यांचे चिरंजीव तेजस चव्हाण (वय ३२) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कुडाळ एमआयडीसी येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ कार्यालय येथे कार्यरत असताना चक्कर येवून पडल्याने गंभीर दुखापत होवून तेजस यांचे निधन झाले.
तेजस चव्हाण हे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळात सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. आज सकाळी 10 वाजता कामावर हजर झाल्यानंतर ते प्रसाधनगृहात गेले असता चक्कर येऊन कोसळले. त्यांचे डोके नळावर आपटल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. प्रसाधनगृहाचा दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले. कै. तेजस चव्हाण यांच्या मागे पत्नी, आई-वडील, एक भाऊ व वहिनी असा मोठा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सेवानिवृत्त अधीक्षक शुभांगी चव्हाण या त्यांच्या आई आहेत.

795

4