प्रत्येकाने एक झाड लावून निगा राखल्यास पर्यावरण संवर्धन-श्रीकांत सांबार

2

आचरा, ता. २ : अर्निंबंध वृक्षतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. यासाठी
प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्यांची योग्य निगा राखल्यास पर्यावरण संवर्धन होण्यास वेळ लागणार नाही असे मत रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचराचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांनी वाचनालयातर्फे आयोजित ग्रंथ प्रदर्शन आणि वृ‌क्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले.
शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरातर्फे कृषी दिनाचे औचित्य साधत संस्थेच्या आवारात कृषी विषयक ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यात कृषीविषयक पुस्तके, संदर्भ ग्रंथ व कृषी विषयक मासिके ठेवण्यात आली होती. शासन आयोजित वनमहोत्सवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे कार्यकारीणी सदस्य अशोक कांबळी यांच्या परसात कडूनिंबाच्या रोपांची लागवड केली गेली. यावेळी उपाध्यक्ष बाबाजी भिसळे, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, अशोक कांबळी, विरेंद्र पुजारे, ग्रंथपाल विनिता कांबळी, महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री, सांस्कृतिक समिती सदस्य राजा जोशी, श्रद्धा महाजनी, गोट्या आचरेकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. कृषी दिनाचे औचित्य साधत आयोजित कृषी विषयक ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला.

4