स्वच्छता अभियानाच्या बक्षिसासाठी सावंतवाडीत सत्ताधारी-विरोधक एकत्र

376
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रांतकार्यालयासमोर धरणे: नगराध्यक्ष साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

सावंतवाडी, ता ३ :येथील पालिकेला स्वच्छता अभियाना अंतर्गत शासनाकडून जाहीर करण्यात आले पाच कोटीचे बक्षीस दयावे या मागणीबाबत शासनाला जाग आणण्यासाठी आज येथील पालिका पदाधिकारी यांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान बक्षिसाची रक्कम मिळावी या मागणीसाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे असे श्री साळगावकर यांनी सांगितले. दरम्यान आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सावंतवाडीसह जिल्ह्यातील कणकवली व वेंगुर्ला या पालिकांना व राज्यातील अशा अनेक नगरपालिकांना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे शासनाकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र बक्षीस जाहीर करून सुद्धा अदयाप ही बक्षिसे देण्यात आलेली नाही. त्यामुळे बक्षिसे कधी मिळतील याबाबत आवश्यकता आहे. याबाबत शासनाला जाग आणण्यासाठी आज येथील पालिकेच्या सत्ता व विरोधी नगरसेवकांनी एकत्र येत धरणे आंदोलन केले.
यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक परिमल नाईक, शुभांगी सुकी, अनारोजीन लोबो, माधुरी वाडकर ,समृद्धी विरनोडकर, भारती मोरे,राजू बेग,नासिर शेख, आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, उदय नाईक, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, दिलीप भालेकर, सचिन इंगळे, सुधीर आडीवरेकर,क्षिप्रा सावंत आदी उपस्थित होते.

\