आयटीआयचा प्राचार्य युवासेनेला जुमानत नाही ही शोकांतिका

2

तुम्हाला जमत नसेल तर मनसे हा प्रश्न हाताळेल ः आशिष सुभेदार यांचा टोला

सावंतवाडी, ता. 03 ः लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलनाची भाषा करणार्‍या युवासेनेला साधा आयटीआयचा प्राचार्य जुमानत नाही ही शोकांतिका आहे. त्यांना हेे आंदोलन जमत नसेल तर मनसेला सांगावे. आम्ही हा प्रश्न हाताळू असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी लगावला आहे.
आयटीआयमधील रिक्त पदे व प्राचार्यांच्या तक्रारी याबाबत पुढील भूमिका घेण्यासाठी काल शिवसेनेच्यावतीने उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतू ठरलेल्या भेटीकडे संबंधित प्राचार्य हणमंत पाटील यांनी पाठ फिरवली. त्यामुळे हा प्रश्न तसाच राहिला. त्यामुळे पुन्हा एकदा सुभेदार यांनी युवासेनेच्या पदाधिकार्‍यांवर टीका केली आहे. तुमची सत्ता असताना, तुमचे नेते असताना अशा प्रकारे अधिकारी ऐकत नसतील तर दुर्दैव आहे. आम्ही आंबोली-सावंतवाडी रस्त्यासंदर्भात आंदोलन करून तो प्रश्न मार्गास लावला. विरोधात असतानासुद्धा आम्ही यश मिळविले. मात्र सत्तेत असताना एक प्राचार्य तुमचे ऐकत नाही ही शोकांतिका आहे, अशी टीका श्री. सुभेदार यांनी केली आहे.

14

4