Friday, December 13, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवलीत पाणी तुंबण्याला नगराध्यक्ष, आमदार जबाबदार

कणकवलीत पाणी तुंबण्याला नगराध्यक्ष, आमदार जबाबदार

सुशांत नाईक; सरपंचांनी केलेली कामे सुद्धा यांना करता आली नसल्याची टीका

कणकवली, ता.3 ः कणकवली शहरात पाणी तुंबण्याला नगराध्यक्ष समीर नलावडे, आमदार नीतेश राणे हेच जबाबदार आहेत. महामार्गालगतच्या ग्रामपंचायतींनी तथा तेथील सरपंचांनी आपापल्या हद्दीत स्ट्रीट लाईट, गटारे, सर्व्हीस रोड करून घेतली. परंतु कणकवली नगराध्यक्ष आणि इथल्या आमदारांना ही कामे करता आली नाहीत. त्यामुळेच शहरात पाणी तुंबले आणि लाखोंची नुकसानी झाली असा आरोप शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी आज केला. इथल्या आमदारांना गडनदीपात्रात वॉटर स्पोर्ट काही चालू ठेवता आले नाही. आता त्यांनी शहरात जेथे पाणी तुंबले तेथे वॉटर स्पोर्ट सुरू करायला हरकत नाही असा टोलाही श्री.नाईक यांनी लगावला.
येथील विजय भवन येथे श्री. नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्यावरील टीकेचा समाचार घेतला. यावेळी शिवसेनेचे सुजित जाधव, शेखर राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सुशांत नाईक म्हणाले, कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली शहरातील सर्व्हीस रोडची रूंदी वाढवून घेतली. बसस्थानकासमोरचा मार्ग खुला करून घेतला. यामुळे वाहतूक कोंडीमधून वाहन चालकांना मुक्तता मिळाली. पण इथल्या लोकप्रतिनिधींना ही कामे करता आली नाहीत ही दुदैवाची बाब आहे. एवढेच नव्हे तर मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण आढावा आणि त्या त्या भागातील समस्या जाणून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी मुंबईत बैठक लावली. या बैठकीत उपस्थित राहून इथले प्रश्‍न मांडण्याऐवजी आमदार नीतेश राणे हे लंडनला फेर्‍या मारत राहिले.
महामार्ग प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाल्याखेरीज कणकवलीत चौपदरीकरणाची वीट रचू देणार नाही असा इशारा राणेंनी दिला होता. तसेच महामार्ग दुतर्फास्टॉलधारकांचे पुनवर्सन करणार अशी घोषणा आमदार नीतेश राणे यांनी वर्षभरापूर्वी केली होती. पण वर्षभरात त्यांनी किती स्टॉलधारकांचे पुनर्वसन केले याचीही माहिती द्यावी असे श्री.नाईक म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments