आंबोली घाटात एसटी कोसळली…

2

अहं… ती रंगीत तालीम.. यंत्रणेची मात्र धावाधाव…

आंबोली/अमोल टेंबकर ता.०३: येथील प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस दरीत कोसळले आहे.असा मेसेज अचानक आल्यामुळे आज दुपारी यंत्रणेची धावपळ उडाली.सर्वांनी घाटात धाव घेतली,परंतु ती तहसीलदार प्रशासनाकडून राबविण्यात आलेली रंगीत तालीम असल्याचे लक्षात येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणा किती अलर्ट आहे,हे पाहण्यासाठी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी आज आंबोली घाटात रंगीत तालीम घेतली.यावेळी पूर्वीचा वस परिसरात दरीत प्रवासी वाहतूक करणारी एसटी बस कोसळली आहे, असा मेसेज सर्व यंत्रणांना देण्यात आला.त्यानंतर सर्वांचीच धावपळ उडाली.ही मोहीम दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राबविण्यात आली.भर दुपारी अशा प्रकारचा मेसेज आल्याने सर्व यंत्रणांची तारांबळ उडाली,परंतु अशा परिस्थितीत त्या ठिकाणी यंत्रणेसह बाबल आल्मेडा टीमने सुद्धा धाव घेतली.
याबाबतची माहिती श्री.म्हात्रे यांनी दिली.ते म्हणाले रंगीत तालमीत आरोग्य,महसूल व पोलीस यंत्रणा पास झाली आहे.वेळेत सर्वजण त्या ठिकाणी दाखल झाले.विशेष म्हणजे बाबल अल्मेडा टीम जंगलमय भागातून पूर्वीचा वस परिसरातील दरीत येण्यास निघाली आहे.त्यामुळे या रंगीत तालमी मध्ये सर्वजण पास झाले आहेत.

23

4