आपत्कालीन यंत्रणा सुशेगाद:प्रवाशांची नाराजी..
? *आंबोली,ता,०४ :* येथील घाटात सावंतवाडी आंबोली मुख्य रस्त्यावर भलेमोठे झाड कोसळल्याने सुमारे अडीच तास वाहतूक ठप्प झाली आहे. हा प्रकार आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कुंभेश्वर परिसरात घडला.याबाबतची माहिती घेऊन सुद्धा आपत्कालीन यंत्रणा अथवा सार्वजनिक बांधकामची कोणतीही टीम घटनास्थळी दाखल न झाल्यामुळे अद्याप पर्यंत वाहतूक सुरळीत झालेली नाही.त्यामुळे दोन्ही बाजूने अडीच तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
घटनास्थळी कोणीच नाही त्यामुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.तर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता आमचे पोलीस त्या ठिकाणी गेले आहेत मात्र संबंधित यंत्रणेला जेसीबी मिळत नसल्यामुळे वेळ लागत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.