बबन साळगावकर; इंनडोअर गेमच्या उद्घाटन प्रसंगी केले आवाहन…
सावंतवाडी ता.०४: बापूसाहेब महाराजांचा वारसा पुढच्या पिढीला कळावा यासाठी मराठी पाठ्यपुस्तकात त्यांच्या नावाचा धडा राज्य शासनाने घ्यावा,त्यासाठी आवश्यक तो प्रयत्न करावा,अशी मागणी सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात बापूसाहेब महाराजांचे नाव अग्रणी आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात यावी,तसे आदेश जिल्हा परिषदेला द्यावेत,अशी मागणी आपण जिल्हा परिषद अध्यक्षांकडे करणार आहोत,असे त्यांनी सांगितले.
स्वर्गीय बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज येथील जिमखाना मैदानावर पालिकेच्या वतीने इनडोअर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले,युवराज लखम सावंत भोसले,उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर,आरोग्य व क्रीडा सभापती बाबू कुडतरकर,नगरसेवक आनंद नेवगी,दिपाली भालेकर,सुरेंद्र बांदेकर,भारती मोरे,माधुरी वाडकर,संजय पेडणेकर,योगेश फणसळकर,सूर्यकांत पेडणेकर,प्रदीप जोशी,सागर नाणोसकर,सचिन इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.खेम सावंत यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.बापूसाहेब महाराजांचे शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठे होते.त्यांच्यामुळे अनेक खेळाडू घडू शकले.सावंतवाडी संस्थांनी अशा त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.यांचा वारसा नेहमीच पुढे सुरू ठेऊ असे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबू कुडतरकर यांनी केले,तर सूत्रसंचालन शैलेश नाईक यांनी केले,आभार सौ कोरगावकर यांनी मानले.