Monday, April 21, 2025
Google search engine
Homeकोंकण पर्यटनवॉटर स्पोर्ट बंदीची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागा दाखवू...

वॉटर स्पोर्ट बंदीची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यांना जागा दाखवू…

सागर नाणोसकर;अधिकारी हप्ते मागतात ही लाजिरवाणी गोष्ट…

सावंतवाडी ता.०४: कायद्याचा बाऊ करून मेरीटाईम बोर्डाकडुन सावंतवाडी मोती तलावातील वॉटर स्कुबा डायव्हींग प्रकल्प बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास अधिकाऱ्यांना योग्य ती जागा दाखवू असा इशारा युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी आज येथे दिला आहे.दरम्यान हा प्रकल्प बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास प्रसंगी युवा सेनेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उभे राहून प्रकल्प सुरू राहण्यासाठी प्रयत्न करतील असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.नाणोसकर यांनी याबाबत प्रसिद्धी पत्र दिले आहे.त्यात त्यांनी असे म्हटले आहे की,सावंतवाडी शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे,हायवे आणि रेल्वे शहराच्या बाजूने गेल्यामुळे शहरावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.त्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प पर्यटनवृद्धीसाठी होणे गरजेचे होते.सावंतवाडी चे नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या पूर्ण टीमने हा वेगळ्या प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला,त्याला पर्यटकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला,परंतु हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर चार तासात तो बंद पडण्याचा सुरू असलेला मेरीटाइम बोर्डाचा प्रयत्न हा विचार करायला लावणार आहे.
एखाद्या या प्रकल्पासाठी अधिकारी हप्ते मागतात ही जिल्ह्याच्या दृष्टीने लाजिरवाणी गोष्ट आहे.एकीकडे पर्यटन विकसित व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असताना अशाप्रकारे अधिकारी त्यात खोडा घालत असतील,तर ते योग्य नाही त्यामुळे येणाऱ्या काळात हा प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न आम्ही करू,काही झाले तरी हा प्रकल्प बंद होऊ देणार नाही.वाटल्यास काही तांत्रिक अडचणी येत असतील तर मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्या सोडवणे गरजेचे आहे .मात्र कायद्यावर बोट ठेवून प्रकल्प बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments