विद्यार्थ्यांनी स्वतःशी प्रामाणिक राहून प्रगती साधावी… : नंदकुमार राणे

2

कुडाळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…

 

मालवण, ता. ०४ : गरीब गरजू मुलांना शैक्षणिक वस्तू देण्याचा वसा आपल्या वडिलांकडून घेत तो पुढे अखंडपणे सुरू ठेवला. विद्यार्थ्यांनी स्वतःशी प्रामाणिक राहून शिक्षणात प्रगती साधावी. प्रथितयश उद्योजक होऊन गरीब गरजू विद्यार्थ्यांना आपणही मदतीचा वसा भविष्यात सुरू करावा असे प्रतिपादन बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रूझ मुंबई ट्रस्टचे सचिव नंदकुमार राणे यांनी येथे केले.
वायरी येथील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षासाठी मोफत वह्यावाटप कार्यक्रम झाला. यावेळी नंदकुमार राणे, पपन मेथर, मनोज लुडबे, मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर, अजय शिंदे, सारिका शिंदे, प्राची परब, दर्शना गुळवे, शिल्पा साटम, अनुराधा पाटकर, प्रीती साटलकर, प्राची पावसकर, श्वेता चव्हाण, अशोक आठलेकर, महादेव नाईक, संजय राठोड, दिनेश खोत, संदीप बाणे आदी उपस्थित होते.
डॉ. कुडाळकर हायस्कूल व प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुरवातीला सरस्वती पूजन प्रसंगी मुलांनी सादर केलेल्या प्रार्थना व श्लोकचे पपन मेथर यांनी विशेष कौतुक केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका नंदिनी साटलकर यांनी केले. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. सुनील आचार्य यांनी आभार मानले.

1

4