प्रश्नमंजुषा स्पर्धेत उषा यमकर- अंकित कोवळे प्रथम…

228
2
Google search engine
Google search engine

शाहू महाराज जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन…

मालवण, ता. ०४ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात मराठी, जिमखाना व वाणिज्य विभागामाफत घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत उषा यमकर व अंकित कोवळे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. प्रेषिता पाताडे व दिव्या देसाई यांनी द्वितीय आणि भाग्यश्री मांजरेकर व दिव्या कुलकर्णी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेत महाविद्यालयातील १४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येकी दोन विद्यार्थी याप्रमाणे ७ गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. सुरवातीस प्रा. उज्ज्वला सामंत यांनी स्पर्धेची माहिती दिली तर प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांनी शाहू महाराजांचे कार्य व जीवनपटाचा आढावा घेतला. परीक्षक म्हणून प्रा. सुमेधा नाईक, प्रा. संग्रामसिंह पवार, प्रा. बी. एच. चौगुले यांनी काम पाहिले. स्पर्धेचे संयोजन व नियोजन जिमखाना प्रमुख प्रा. एच. एम. चौगले, प्रा. उज्ज्वला सामंत यांनी केले. यासाठी प्रा. के. के. राबते यांचे सहकार्य लाभले. प्रा. चौगले यांनी आभार मानले.