भूमिपूजनानंतरही बसस्थानकाच्या कामास सुरवात नाही… निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आमदार करतात स्टंटबाजी ; सुनील घाडीगांवकर यांचा आरोप

2

मालवण, ता. ४ : लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन झालेल्या बसस्थानकाच्या कामास का सुरवात झाली नाही अशी विचारणा करत निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आमदार स्टंटबाजी करत असल्याचा घणाघात पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केला.
बसस्थानकाच्या कामास जर परवानगीच मिळाली नाही तर भूमिपूजन का करण्यात आले अशी विचारणा त्यांनी आगार व्यवस्थापक एन. व्ही. बोधे यांना केली. यावर त्यांनी आता सर्व प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याची माहिती दिली. भूमिपूजन नंतर प्रत्यक्ष का सुरवात झाली नाही याची माहिती पुढील बैठकीत देण्यात यावी असे श्री. घाडीगांवकर यांनी सांगितले.

2

4