हायवे अभियंता शेडेकर यांना महिलांकडूनही प्रसाद

1455
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आमदारंसह स्वाभिमान कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार

कणकवली, ता. ०४ : कणकवली शहरातील चिखलमय रस्त्यांची पाहणी करताना संतापलेल्या महिला कार्यकर्त्यांनीही हायवेचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना थापटांचा प्रसाद दिला. याखेरीज गुडघाभर चिखलातून शेडेकर यांना चालायलाही लावले. आम्ही जनतेसाठी भांडतोय. रस्ते सुस्थितीत असावेत यासाठी आमचा लढा सुरू आहे. त्यासाठी जेलमध्ये जावे लागले तरी चालेल. पोलिस केसेसही घेण्याचीही आमची तयारी आहे. यापुढे रस्ता सुधारणा झाली नाही तर तुम्हालाच खड्डयात घालू पण जनतेला त्रास होऊ देणार नाही असा इशारा देखील आमदार नीतेश राणे यांनी दिला.
दरम्यान अभियंता शेडेकर यांना धक्काबुक्की आणि त्यांच्या अंगावर चिखल ओतल्या प्रकरणी आमदार नीतेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि इतर स्वाभिमान कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून त्याबाबतची प्रक्रिया पोलिस प्रशासनाने सुरू केली आहे. तर शेडेकर यांनी अद्याप पोलिस स्थानकात तक्रार दिलेली नाही. आंदोलना दरम्यान त्यांना पोलिस संरक्षणात बाहेर काढून कणकवली पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र शेडेकर तक्रार दाखल न करताच सावंतवाडीला निघून गेले होते.
महामार्गाच्या दूरवस्थेप्रश्‍नी आमदार नीतेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक पावित्र्याला कणकवलीरांनीही पाठिंबा दिला. राणेंच्या महामार्ग पाहणी दरम्यान शहरातील अनेक प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या मांडल्या. तर हायवे अधिकार्‍यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. आजच्या आंदोलनात नगराध्यक्ष समीर नलावडे, बांधकाम सभापती संजय कामतेकर यांच्यासह नगरसेविका मेघा गांगण, वागदेचे माजी सरपंच संदीप सावंत, स्वाभिमानचे युवक जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, पंचायत समिती सदस्य संदीप मेस्त्री, बबन हळदिवे, राकेश राणे, संदीप नलावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

\