सावंतवाडी विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करा..वेंगुर्ले महाराष्ट्र स्वाभिमानच्या सभेत पदाधिकाऱ्यांची मागणी

2

वेंगुर्ले, ता.४ :वेंगुर्ले तालुका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मासिक बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीसाठी वेंगुर्ले-सावंतवाडी-दोडामार्ग मतदार संघासाठी उमेदवार म्हणून अनेकांची नावे चर्चीली जात आहेत. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराचे नाव लवकरात लवकर पक्षाने जाहिर करावे अशी मागणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी केली.

वेंगुर्ले तालुका स्वाभिमान पक्षाची मासिक सभा अध्यक्ष विष्णुदास उर्फ दादा कुबल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी माजी तालुकाध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष बाबली वायंगणकर, निलेश सामंत, जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, महिला तालुकाध्यक्षा सौ.सारीका काळसेकर वसंत तांडेल,जयंत मोंडकर, नाथा मडवळ, ज्ञानेश्वर  केळजी, नगरसेविका शितल आंगचेकर, कृपा मोंडकर, प्रार्थना हळदणकर, पप्पु परब, तुषार साळगांवकर, समिर कुडाळकर, सायमन आल्मेडा तसेच भूषण सारंग, मनवेल फर्नांडीस, नितीन चव्हाण, मारुती दौडशानहट्टी, भूषण आंगचेकर, सुजाता देसाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वेंगुर्ले तालुक्यातील विकास कामांवर चर्चा करताना सध्या शहरात वीजेचा जो खेळखंडोबा सुरु आहे त्यावरची चर्चा झाली. तालुक्यातील आरोग्य यंत्रणाही व्हेंटीलेटरव असून त्याबाबत आवाज उठविण्याचे ठरले. दरम्यान होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीसाठी सर्वच पक्ष आपआपल्या परिने लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे नाव जाहिर झाल्यास पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना तळागळात जाऊन पक्षवाढी बरोबर उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात करता येणार आहे. त्यामुळे उमेदवरावाचे नाव पक्षाने जाहिर करावे अशी मागणी करण्यात आली.

2

4