मालवणातील युवकांची तक्रार; बेळगावातील १५ ते २० जणांचा समावेश…
सावंतवाडी ता.०४: आंबोली येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात मालवण येथील युवकांना मारहाण करून त्यांचे सोन्याचे दागिने काढून घेतल्याप्रकरणी बेळगाव येथील अज्ञात १५ ते २० जणांवर रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबतची तक्रार सिताराम सत्यवान पावसकर (३१) रा.सुकळवाड-मालवण यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास मालवण येथील युवक व बेळगावातील पर्यटक यांच्यात कावळेसाद पॉइंट वर वाद झाले होते.यातून १५ ते २० युवकांनी आपल्याला लाट्या-काट्याने मारहाण केली अशी तक्रार श्री.पावसकर यांनी केली होती.यात पावसकर यांच्या सह त्यांचे मित्र मनोज मधुकर वायंगणकर (२८) ,विक्रम प्रकाश मुरकर (२८), परेश गुरुनाथ बांदेकर (२२) , चेतन प्रमोद मुसळे (३२,)सर्व रा.सुकळवाड मालवण आदी जखमी झाले होते.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करीत आहेत.