साळगावकरांशी चर्चा :वॉटर स्पोर्टच्या अडचणी दूर करण्याचा शब्द
सावंतवाडी,ता.०४: मोती तलावात सुरू असलेल्या वॉटर स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंग वरून सावंतवाडी नगरपालिका व बंदर विभाग यांच्यात कलगीतुरा रंगलेला असतानाच त्या प्रकल्पाच्या विरोधात बंदर विभागाच्या अधिका-यांनी बजावलेल्या नोटिसीला खुद्द बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ब्रेक लावला आहे.
तुम्ही माझ्याकडे अर्ज द्या मी परवानगी देतो असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे स्पोर्ट्स आणि स्कुबा डायव्हिंग वरून निर्माण झालेले वादळ शमण्याची शक्यता आहे.झालेल्या वादानंतर उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर यांनी राज्यमंत्री चव्हाण यांच्या मोबाईलवर संपर्क साधून झालेल्या प्रकाराची माहिती दिली त्यानंतर साळगावकर यांच्याशी चर्चा करून चव्हाण यांनी माहीती घेतली. यावेळी बंदर विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या नोटीसीचे मी बघतो,तुम्ही घाबरू नका, तुम्हाला परवानगी देतो,तुम्ही माझ्याकडे फक्त अर्ज करा असे चव्हाण यांनी साळगावकर यांना सांगितले.यावेळी नगरसेवक आनंद नेवगी उपस्थित होते.