माणगाव खोऱ्यात युवासेनेतर्फे घरपोच दाखले / युवासेनेचा स्तुत्य उपक्रम

2

माणगाव, ता. ०४ : माणगाव खोऱ्यात युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी यांच्या माध्यमातून आणि माणगाव खोरे युवासेना  आयोजित दाखले मेळाव्याला उदंड प्रतिसाद लाभला. यावेळी 60 दाखल्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाची या उपक्रमाची ग्रामस्थानी प्रशंसा केली. दाखले मोफत आणि घरपोच मिळाल्याने दाखले काढण्यासाठी होणारी दगदग वाचल्यामुळे पालकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. योगेश धुरी यांनी आपले कार्य असेच चालू ठेवावे अशी सदिच्छा पालकांनी व्यक्त केली.

यावेळी युवासेना विभागप्रमुख आप्पा मुंज, माजी ग्रामपंचयात सदस्य सुनील सावंत, साई नार्वेकर, बंटी भिसे, शैलेश विरनोडकर, नानेली ग्रामपंचयात सदस्य सिद्धेश धुरी, सुमित आडेलकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे आभार यावेळी मानण्यात आले.

17

4