२५ कोटींतून जिल्हा राजधानीच्या समस्या सोडवाव्यात | खा. राऊत यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

2

सिंधुदुर्गनगरी ता. ०४ : पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीतील नवनगर विकास प्राधिकरणाला २५ कोटींचा विकास निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून जिल्हा राजधानीच्या समस्या सोडवाव्यात अशी, मागणी निवेदनाद्वारे खा विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे केली आहे. खा राऊत यांच्यावतीने शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
खा. राऊत यांनी दिलेल्या निवेदनात, सिंधुदुर्गनगरी नवनगर येथील रस्ते, वीज, पाणी, सांडपाणी सुशोभीकरण, परिसर साफसफाई याचे व्यवस्थापन बिघडल्याने दिसत आहे. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारा पासून झाडी वाढलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतल्यासमोरील कमान व जिल्हा मुख्यालय प्रवेशद्वार कमान अतिशय खराब झाली आहे. याबाबत प्रसार माध्यमांनी आवाज उठवूनही या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्री केसरकर यांची वेळ घेऊन मुख्यालयातील समस्यांची पाहणी करावी, असे खा. राऊत यांनी निवेदनात नमूद केले आहे. याबाबत ओरोस ग्राम पंचायत सदस्य तथा युवासेना विभाग प्रमुख अमित भोगले यांनी खा. राऊत यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. यावेळी ग्राम पंचायत सदस्य परिणिता कदम, सुनील जाधव आदी उपस्थित होते.

23

4