हायवे उपअभियंता शेडेकर यांची कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार | स्वाभिमान कार्यकर्त्यांची कणकवलीत धरपकड सुरू

375
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता. ०४ : महामार्ग दुरावस्था प्रश्नाबाबत कणकवली शहरात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन झाले. यात महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधून ठेवण्याचा प्रकार झाला तसेच त्यांच्यावर चिखलाच्या बादल्या ओतण्यात आल्या. याबाबतची तक्रार श्री. शेडेकर यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात नोंदवली. ही तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अन्य स्वाभिमान कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद झाल्याने या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने कणकवली शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राणेंच्या ओम गणेश या निवासस्थानी देखील पोलीस तुकडी तैनात करण्यात आली आहे. दरम्यान सायंकाळी सहा वाजता आमदार नितेश राणे स्वाभिमान कार्यकर्त्यांसह कणकवली पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर होणार असल्याची माहिती स्वाभिमान पक्षाकडून देण्यात आली.

\