आतापर्यंत २,४३५ हेक्टर तरवा लावणी…
सिंधुदुर्गनगरी ता.०४:
गेल्या आठवडाभरात पडत असलेल्या दमदार पावसामुळे लावणीच्या कामांना वेग आला आहे. आतापर्यंत २ हजार ४३५ क्षेत्रावर तरवा लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. तर ४७ हजार २५० हेक्टर क्षेत्र भात लागवडी खाली येणार असल्याची माहिती कोरडवाहू जिल्हा सल्लागार अरूण नातू यांनी दिली.
जिल्ह्य़ात खरिप हंगामात एकूण ६२ हजार ३६५ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येईल असे नियोजन करण्यात आले होते. सर्वात जास्त भात पिकाचे लंक्षाक होते. ५९ हजार २३० हे. क्षेत्र भात लागवडीसाठी निश्चित केले होते. त्यानुसार ५.९२० हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी होणे आवश्यक होते. परंतू प्रत्यक्षात ४ हजार ७२५ हेक्टर क्षेत्रात भात पेरणी झाली. त्यामुळे प्रत्यक्षात ४७ हजार २५० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणार आहे. दमदार पाऊस पडल्याने भात लावणीच्या कामांना गती मिळाली आहे. आतापर्यंत २ हजार ४३५ हेक्टर क्षेत्रावर लावणी पूर्ण करण्यात आली आहे. शेतीच्या कामाची गती समाधानकारक असल्याचे अरूण नातू यांनी सांगितले. यात देवगड १८५ हेक्टर, मालवण ३४५ हेक्टर, कणकवली ३०० हजार हेक्टर, वैभववाडी २७० हेक्टर, सावंतवाडी २५५ हेक्टर, दोडामार्ग २७५ हेक्टर, वेंगुर्ला ३३५ हेक्टर, कुडाळ ४७० हेक्टर एवढ्या क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे.
तर नागलीसाठी लक्षांक १ हजार ५२० हेक्टर, कडधान्ये ३९० हेक्टर, तेलबिया लक्षांक ६२५ हेक्टर, भाजीपाला लक्षांक ६०० हेक्टर क्षेत्र देण्यात आला आहे.