मांगवली बौद्धवाडीत घरावर झाड कोसळले

2

वैभववाडी/प्रतिनिधी : गुरुवारी दुपारी झालेल्या जोरदार वादळी पावसाने मांगवली बौध्दवाडी येथील अशोक रघुनाथ कांबळे यांच्या घरावर रिंगीचे झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले आहे.

गुरुवारी दुपारी मांगवली परिसरात जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसाने कांबळे यांच्या घरावर रिंगीचे झाड पडले. त्यामुळे घराचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसाने घरातील अन्नधान्य व इतर साहीत्य भिजल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी यांनी पंचनामा केला आहे. यावेळी जि.प.सदस्या शारदा कांबळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

31

4