मालवण, ता. ४ : शहरातील बसस्थानक इमारतीच्या कामास अद्याप परवानगी का दिली नाही अशी विचारणा करत आमदार वैभव नाईक यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी, नगर अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत आज परवानगी मिळालीच पाहिजे असे सांगत आक्रमक भूमिका घेतली. अखेर दोन तासाच्या आत आगार व्यवस्थापकांकडे परवानगीची प्रत प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, तपस्वी मयेकर, सन्मेश परब, यशवंत गावकर, किरण वाळके, स्वप्नील आचरेकर, दीपा शिंदे, अंजना सामंत, मंदार गावडे, अमित भोगले यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार नाईक यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे येथे सुसज्ज बसस्थानकासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार बसस्थानकासाठी ३ कोटी १२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. बसस्थानकाच्या ठिकाणी अद्ययावत असे बसस्थानक उभारले जाणार आहे. विशेष म्हणजे आमदार नाईक यांच्या संकल्पनेतून या बसस्थानकात सिनेमागृहाचीही निर्मिती होत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या बसस्थानकाचे भूमिपूजन झाले. मात्र बसस्थानक काम अद्यापही सुरू न झाल्याने पंचायत समितीच्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर यांनी प्रश्न उपस्थित केला. यात आगार व्यवस्थापकांनी अद्याप बांधकामाची परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले.
या पार्श्वभूमीवर मालवण दौर्यावर असलेल्या आमदार नाईक यांनी आगारव्यवस्थापक, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी, नगर अभियंता यांना चांगलेच खडसावले. शासकीय इमारतीची परवानगी द्यायला एवढा उशिरा का ? असा प्रश्न केला. यावेळी नगरअभियंत्यानी नवीन ऑनलाइन प्रक्रिया व त्यात निर्माण झालेल्या काही तांत्रिक बाबींमुळे परवानगीची प्रक्रिया रखडल्याचे सांगत आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. आमदार नाईक यांनी अधिकार्यांना फैलावर घेताच अवघ्या दोन तासाच्या आतच नगरपरिषदेच्या अधिकार्यांनी बसस्थानक बांधकाम परवानगीची उर्वरित प्रक्रिया पूर्ण करत परवानगीची प्रत आगार व्यवस्थापकांकडे सुपूर्द केली.
बसस्थानक इमारत बांधकाम परवानगी प्रश्नी अधिकारी धारेवर… आमदारांच्या दणक्यानंतर दोन तासात परवानगी…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES