अभियंत्यावर चिखलफेक,आमदार नितेश राणेंना अटक…

532
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली ता.०४: राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिकल फेक केल्याप्रकरणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते तथा आमदार नितेश राणे यांना यांना अखेर कणकवली पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकारानंतर त्यांच्यासह ४० ते ४५ कार्यकर्त्यावर सरकारी कामात अडथळा करून शासन शासकीय मालमत्तेचे नुकसान तसेच अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकाराचा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी निषेध केला होता.नितेश हे माझे पुत्र असले तरी त्यांच्याकडून झालेला प्रकार योग्य नाही.एका अधिकाराबाबत असा प्रकार होणे गैर आहे.असे त्यांनी वक्तव्य केले होते.या प्रकरणानंतर त्यांनी माफी मागितली होती.तसेच झालेल्या प्रकाराबाबत स्वतः आमदार नितेश राणे माफी मागतील असे त्यांनी म्हटले होते.दरम्यान आज सायंकाळी खुद्द आपल्या काही निवडक कार्यकर्त्यांसमवेत नितेश कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले त्यानंतर त्या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांची गर्दी झाली.
यावेळी नितेश यांच्यासह अन्य दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले आहे.

\