अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले…
आचरा, ता. ४ : रानात उगवणाऱ्या अळंबीची भाजी खाल्ल्याने तालुक्यातील वायंगणी येथील एकाच कुटूंबातील ५ जणांना विषबाधा झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या पाचही जणांवर आचरा येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून ओरोस येथे अधिक उपचारासाठी हलविले आहे.
वायंगणी येथील माळकर कुटुंबातील सुनील माळकर (वय-४७), राज सुनील माळकर (वय-१६), सुप्रिया सुनील माळकर (वय-४५), संपदा सुनिल माळकर (वय-२९), अमिता अनिल धुरी (वय-५०) यांना अळंबीची भाजीतून विषबाधा झाली आहे. या पाचही जणांनी बुधवारी रात्री साडे नऊ वाजता रात्रीच्या जेवणात अळंबीची भाजी खाल्ली होती. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास पाचही जणांना पोटात दुखून उलट्या होऊ लागल्याने त्यांना आचरा आरोग्य केंद्रात दाखल केले. आचरा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शामराव जाधव यांनी तत्काळ त्यांच्यावर उपचार करत अधिक उपचारासाठी त्यांना मध्यरात्री अडीचच्या सुमारास ओरोस येथे हलवण्यात आहे.